बालेवाडी:
विद्यार्थ्यांना पुणे दर्शनाचा आनंद घेता यावा म्हणून बालेवाडी येथील कै. बाबुराव शेटजी बालवडकर महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी पुणे शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी सहलीला रवाना झाले. या सहलीचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका कल्पनाताई बाबर, शिक्षकप्रभारी मुख्याध्यापक सुकेशीनी मोरे मॅडम, वैशाली मिसाळ, शोभा घोरपडे, अशोक वाघमारे सर, प्रवीण अंदुडगे सर, अरुणा राठोड मॅडम, उज्जला पवार, रुपाली पाठक, सुवर्णा कावळे, मॅडम, इ.शिक्षक आणि सेवक गणेश मुजुमले उपस्थित होते, पोलीस पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर यांच्यासह शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांना पुण्याचे प्रमुख पर्यटनस्थळे पाहण्याचा संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी शिवसृष्टी, इस्कॉन मंदिर, सायन्स पार्क, सेव्हन वंडर बाग, सोमेश्वर वाडी आणि ग्रामीण जीवन संस्कृतीचे दर्शन शनिवार वाडा अशी पुण्यातील ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे मुलांना दाखविण्यात येणार आहे. एकूण अकरा बसेस सहलीसाठी रवाना करण्यात आल्या.
राहुलदादा बालवडकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले, “आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे ज्ञान घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुणे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळणार आहे. अशा सहली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.”



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी