May 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडीत 75% पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान, श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत मेडिकल किटचे वाटप…

बाणेर :

लोकशाही बळकट करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने बाणेर-बालेवाडी परिसरातील 75% पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सौजन्याने ‘ऍलॅक्रिटी’, ‘राहुल आर्कस’ आणि ‘वेंटेज’ या सोसायट्यांना मोफत मेडिकल सर्जिकल किटचे वाटप करण्यात आले.

 

तसेच यावेळी बैठकीत पुढील वर्षी पुणे मनापाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. मा ना चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीने पुढील वर्षी प्रभागातील कामांचे नियोजन करण्यात आले याचीही माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच मेट्रोचे काम नवीन सबस्टेशन, पोलीस स्टेशन, २४×७ पाणीपुरवठा योजना, मिसिंग लिंक यादी कामांची माहिती देण्यात आली.

लोकशाहीसाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची
मतदान हा केवळ हक्क नसून कर्तव्य आहे. नागरिकांचा जागरूक सहभाग हा लोकशाहीला बळकटी देतो. उच्च मतदान करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करण्यासाठी वैद्यकीय साहित्य किटचे वाटप करण्यात आले, असे भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अभिजित कुंतूरकर, शैल श्रीधर गुर्जर, अनिकेत जोशी, वैभव धर्माधिकारी, नारायण रामचंद्र जोशी, श्रीराम जाधवर, सूचित आवळगांवकर, हेमंत सावरगावकर, मयूर पोतनीस, प्रियांका मिस्त्री, गायत्री चव्हाण, मनीषा केसरकर, श्वेता सेठ, तनुज नागराणी, दिनेश शर्मा यांसह मोठ्या संख्येने सोसायटी सदस्य आणि रहिवासी उपस्थित होते.

श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, पुढील निवडणुकीत अधिकाधिक मतदार मतदानासाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.