May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी हाय स्ट्रीट ग्राउंडवर भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचा थरार थेट प्रेक्षकांसाठी! अमोल बालवडकर यांचा उपक्रम..

बालेवाडी :

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सामना थेट लाईव्ह पाहण्याची सुवर्णसंधी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगेकराना मिळणार आहे. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सामना बालेवाडी हाय स्ट्रीट ग्राउंड येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर प्रसारित केला जाणार आहे.

हा रोमांचक सामना दुपारी २ वाजता सुरू होईल, आणि क्रिकेट चाहत्यांसाठी तो अप्रतिम अनुभव ठरणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच असते, आणि त्यामुळे हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

हा उपक्रम अमोल भैय्या बलवडकर, माजी नगरसेवक, पीएमसी, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी हा रोमांचक सामना एकत्र पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

तुम्ही सज्ज आहात ना? चला, क्रिकेटचा आनंद लुटूया मोठ्या स्क्रीनवर!