May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल स्कूल बावधनमध्ये आजी – आजोबा दिनानिमित्त आजी आजोबा व नातवंड यांचा भरला मेळावा!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या बावधन शाखेत आज शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आजी आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नातवंडांनी औक्षण करून व त्यांनी बनवलेले शुभेच्छा पत्र देऊन आजी-आजोबांचे स्वागत केले. त्यांनी आजी आजोबांसोबत काही खेळही खेळले. यात त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता.शाळेतर्फे नातवंडांनी केलेले हे कौतुक बघून बऱ्याच आजी आजोबांचे डोळे आनंदाने पाणावले.

 

या आजी-आजोबांना ही चिमुकली मंडळी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आजोबा आणि आजी यांच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेले आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आले. यावेळी आजी आजोबांसाठी वेगवेगळ्या खेळांचे नियोजन करण्यात आले होते. विजयी आजोबांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुस्तके व तुळशीचे रोप बक्षीस रूपाने दिले.

आजी आजोबांचे व नातवंडांची नाते हे मैत्रीपूर्ण व आणखी घट्ट करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत केले जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडीत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी शाळेच्या संस्थापिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल यांनी आजी आणि नातवाच्या नात्यातील पैलू उलगडून अगदी सहज सोप्या शैलीत आजी आजोबांना आपली भूमिका कशी असावी हे पटवून दिले.

आजच्या या आगळ्या वेगळ्या आजी आजोबा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सौ.कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी टकोरे यांनी केले.