बालेवाडी :
शिवजयंतीनिमित्त बालेवाडी गावाच्या चौकामध्ये डांबरीकरण करून नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंच आणि वाचनालयाची सुविधा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी माजी सरपंच अंकुशराव बालवडकर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर नाना बालवडकर, शाम भाऊ बालवडकर, तुषार बालवडकर, विशाल बालवडकर, नरेंद्र बालवडकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. चौकामध्ये डांबरीकरण झाल्याने आता ये-जा अधिक सोयीस्कर होणार असून, बसण्यासाठी बेंच आणि वाचनालयामुळे नागरिकांना आराम व ज्ञानाचा आनंद घेता येणार आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी