May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस मधील पार्थ जय सोसायटीला समीर चांदेरे यांची भेट, नागरी समस्या बाबत साधला संवाद…

सुस :

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सूस येथील पार्थ जय सोसायटीला भेट देऊन सोसायटीच्या पदाधिकारी व सभासदांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोसायटी आणि परिसरातील नागरी समस्या जाणून घेतल्या

 

सोसायटीच्या सदस्यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी व्यवस्थापन आणि सुरक्षितता यांसारख्या विविध समस्या मांडल्या. या तक्रारींची दखल घेत समीर चांदेरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. स्थानिक नागरिकांनी या भेटीचे स्वागत केले आणि नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठी समीर चांदेरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.