May 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ऑलिम्पियाड विजेत्यांचा सन्मान! चमकले विद्यार्थी, मिळाली सुवर्णसंधी!

बावधन :

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ऑलिम्पियाड परीक्षेच्या विजेत्यांचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. यंदा शाळेच्या 68 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यापैकी 8 विद्यार्थ्यांनी वर्ग मेरिट मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले, तसेच 1 विद्यार्थ्याने झोन स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरविण्यात आले.

 

गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे यश:
🔹 पवळे श्रवण मोहित (इयत्ता 2 – गणित) – वर्गात प्रथम क्रमांक
🔹 शिरसाठ पृथ्वीराज सागर (इयत्ता 2 – गणित) – वर्गात द्वितीय क्रमांक
🔹 जाधव श्रावणी संतोष (इयत्ता 3 – गणित) – वर्गात प्रथम क्रमांक
🔹 शिंदे श्रिराज सुभाष (इयत्ता 3 – गणित) – वर्गात द्वितीय क्रमांक
🔹 देवकर संस्कृती कुशीनाथ (इयत्ता 4 – गणित) – वर्गात प्रथम क्रमांक
🔹 खरात अन्विता (इयत्ता 4 – गणित) – वर्गात प्रथम क्रमांक
🔹 राऊत आरुष निलेश (इयत्ता 4 – गणित) – वर्गात द्वितीय क्रमांक
🔹 अक्षरा शेठ (इयत्ता 6 – गणित) – वर्गात प्रथम क्रमांक
🔹 सुरभी दुखांडे (इयत्ता 9 – सामान्य ज्ञान) – झोन स्तरावर प्रथम क्रमांक

शालेय प्रांगणात जल्लोषाचे वातावरण असताना, संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत, पर्यवेक्षिका इंदू पाटील, पूनम पांढरे व सना इनामदार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले तसेच सर्वांनी त्यांच्या यशामागील मेहनतीची प्रशंसा केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या अपूर्व मेहनतीला सलाम केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.