बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या वतीने दरवर्षी या परिसरात राहणाऱ्या आणि सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा व पर्यावरण या क्षेत्रात उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात योतो, पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो. यंदाच्यावर्षी या पुरस्काराचे तिसरे वर्ष होते व मानकरी ठरले
श्री. पांडूरंग साळगांवकर- क्रिडाक्षेत्रातील योगदान
श्री. गिरीधर राठी – सामाजिक कार्य
सौ. मेघना भंडारी सकलेचा – पर्यावरण संवर्धन.
दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवचरित्राचे अभ्यासक श्री.भास्करराव बाबार, व श्री गणपतराव बालवाडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.रमेश रोकडे यांनी भूषविले कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.अशोक नवाल यांनी केली तर कार्यक्रमाचे समन्वयक अमेय जगताप यांनी पुरस्काराविषयी उपस्थितांना माहिती दिली. तर ॲड.एस.ओ. माशाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली, यावेळी विराज सस्ते याने पोवाडा सादर केला. यानंतर ‘रयतेचा राजा छत्रपती शिवाजी’ या विषयावर श्री. बाबर यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमात मंचावर फेडरेशन चे उपाध्यक्ष ॲड.परशुराम तारे, खजिनदार डी. डी.सिंग, उपस्थित होते. अस्मिता करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात शिवाजी महाराजांवर लहान मुलांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते व सर्व सहभागी मुलांना. प्रशस्तीपत्र देण्यात आले. याकामी सौ. शुभांगी इंगवले-चपाते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला विकास कामत, डाॕ.सुधीर निखारे, मोरेश्वर बालवडकर, शकील सलाती, आशीष कोटमकर, योगेंद्र सिंग, सचिन पाटील हे फेडरेशन च्या कमिटी सदस्यांबरोबर बालेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!