May 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील कै. बाबूराव (शेठजी) गेणूजी बालवडकर प्राथमिक विद्यालयासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार…

बालेवाडी :

कै. बाबूराव (शेठजी) गेणूजी बालवडकर प्राथमिक विद्यालय, म.न.पा. शाळा क्रमांक १२१बी, बालेवाडी येथे विविध आवश्यक सुविधांसाठी पुणे महानगरपालिका औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. गिरीश दापकेकर आणि उपअभियंता श्री. दीपक लांडे यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे शाळेतील अनेक कामे मार्गी लागली.

 

या कार्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रकाश तात्या बालवडकर, संघटनेचे कार्यकर्ते आणि शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बाबर, सौ. शोभा घोरपडे, श्रीमती सुकेशिणी मोरे, श्री. अशोक वाघमारे, श्री. भिवसेन घोडे, मोरेश्वर बालवडकर, तसेच बालेवाडी गावाचे पोलीस पाटील श्री. आनंदराव कांबळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष श्री. संदीप बालवडकर उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यामुळे शाळेच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन व समाजाच्या संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले.