बालेवाडी :
अखिल बालेवाडी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. संपूर्ण बालेवाडी परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी दणाणून गेला. उत्सवाची सुरुवात पहाटे शिवज्योत आणि भव्य मोटारसायकल रॅलीने झाली. सकाळी ७.३० वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, महाळुंगे बालेवाडी येथून ही रॅली निघाली आणि संपूर्ण परिसर शिवमय झाला. त्यानंतर शिवजन्मोत्सव सोहळ्यात मूर्तीपूजन मोठ्या भक्तिभावाने पार पडले.
शिवजयंती निमित्ताने राहुलदादा बालवडकर यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळी शिव आरती व शिववंदनेने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, बालेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणुकीने संपूर्ण बालेवाडी दुमदुमून गेले. पारंपरिक ढोल-ताशा पथके, लेझीम पथक, मर्दानी खेळ आणि घोडेस्वारांसह काढण्यात आलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. रात्री बालेवाडी गावठाण येथे महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली.
या भव्य सोहळ्यात स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. शिवरायांचे विचार आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या सोहळ्यातून सफल झाला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी