बाणेर :
महाराष्ट्र कबड्डी संघ ७१व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कटक, ओरिसा येथे रवाना झाला आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सराव शिबिर पूर्ण केल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाणेर येथील महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन संघाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २० ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ओडिशाच्या कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुलात होणार आहे गतवर्षी अहमदनगर येथे झालेल्या ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्यपदक मिळवले होते。 यावर्षी संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश असून, सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवून संघ मैदानात उतरणार आहे。
आकाश शिंदे यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून सचिन शिंदे आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रताप शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी संघाला शुभेच्छा देताना सांगितले की, “निवड समितीने संघ निवड करताना उत्कृष्ट संघ निवडला असून सराव शिबिरात संघाने उत्कृष्ट तयारी केली आहे, संघ संतुलित असून आम्हाला विश्वास आहे की यंदा महाराष्ट्र संघ सुवर्णपदक मिळवेल.”
महाराष्ट्राचा संघ संतुलित असून संघाच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह आहे, आणि ते राज्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध आहे : आकाश शिंदे (कर्णधार)
महाराष्ट्र संघातील खेळाडूंची यादी:
1. आकाश शिंदे (कर्णधार)
2. आकाश रूडले
3. शंकर गदई
4. तेजस पाटील
5. संकेत सावंत
6. अक्षय सूर्यवंशी
7. मयूर कदम
8. शिवम पठारे
9. प्रणय राणे
10. अजित चौहान
11. कृषिकेश भोजने
12. संभाजी वाबळे
संघाच्या निरोप समारंभाच्या वेळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, निवड समिती सदस्य अर्जुन शिंदे, नासिर सय्यद, समीर थोरात, जगन्नाथ धनकुडे, आत्माराम कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते。
More Stories
कोथरूड विधानसभासह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! नामदार चंद्रकांतदादा पाटील
सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप..’व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान
बाणेर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान; अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते