April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे शिवजयंती निमित्त संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा भव्य उत्सव!”

पिरंगुट :

पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये एका भव्य सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कला, परंपरा आणि शौर्याचे अप्रतिम प्रदर्शन घडवले.

 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने झाली. या उत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे शिवाजी महाराजांची आगमन मिरवणूक, जी पारंपरिक ढोलताशांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या लयबद्ध हालचालीत आणि जयघोषांच्या निनादात साजरी करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पाळणा आणि पोवाडा या सादरीकरणांनी वातावरण भक्तिमय आणि आनंददायी झाले.

लाठीकाठी प्रदर्शनाने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने लाठीकाठीच्या प्रभावी हालचाली दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर नृत्य आणि भाषणांमधून कला व विचारांचे उत्तम सादरीकरण झाले.

कार्यक्रमात पर्यवेक्षक इंदू पाटील मॅडम यांचे प्रेरणादायी भाषण, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण झाली. त्यानंतर शिवगर्जना झाली व शपथ विधी घेण्यात आला, जिथे विद्यार्थ्यांनी निष्ठा, प्रामाणिकतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाचा शेवट भव्य किल्ला प्रदर्शनाने झाला, जिथे विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गड-किल्ल्यांची देखणी प्रतिकृती साकारून इतिहासाचे स्मरण करून दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका इंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली ओंबासे आणि शीतल पोतदार यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट नेहमीच अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवत राहील!

You may have missed