May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

लिटिल मिलेनियम प्री-स्कूल, पिंपळे सौदागर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा..

पिंपळे सौदागर :

“घरा घरात शिवराय, मना मनात शिवराय” या विचाराने प्रेरित होत लिटिल मिलेनियम प्री-स्कूल, पिंपळे सौदागर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे आयोजन डायरेक्टर सौ. हेमलता कानडे आणि कोथरूड विधानसभा भाजप पदाधिकारी सौ. कल्याणी टोकेकर, सौ. निकिता माताडे आणि सौ. हर्षदा माताडे यांच्या संयुक्त माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करत महाराजांच्या शौर्यगाथेचे वर्णन केले. तसेच लेझीम आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात लहानग्यांनी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या रूपात वेशभूषा साकारली.

या शिवजयंती सोहळ्यात ७० विद्यार्थी आणि १५ शिक्षकवृंदांनी उत्साहाने सहभाग घेतला. शिवरायांच्या विचारांचा जागर घडवणारा हा प्रेरणादायी सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.