बालेवाडी :
छत्रपती शिवाजी महाराजांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि त्यांची शौर्यगाथा लहान मुलांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी लिटिल मिलेनियम स्कूल, बालेवाडी येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप कोथरूड विधानसभा पदाधिकारी सौ. कल्याणी टोकेकर (उपाध्यक्ष, उत्तर मंडल), सौ. हर्षदा थिटे (प्रभाग सरचिटणीस) आणि सौ. निकिता माताडे (सचिव, उत्तर मंडल) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. तसेच शाळेच्या डायरेक्टर सौ. हेमलता कानडे यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण रचना केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर भाषणे केली तसेच ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शिक्षकांनी “शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध” या ऐतिहासिक प्रसंगावर नाटक सादर केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाने झाली, त्यानंतर शिवदिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० विद्यार्थी आणि २० शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, बक्षीस आणि खाऊ देऊन सन्मानित करण्यात आले. शिवजयंतीचा हा प्रेरणादायी सोहळा लहान मुलांसाठी एका संस्मरणीय अनुभवाचा ठरला.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*