May 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल स्कूल बावधनमध्ये पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी

बावधन :

आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा! झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा…
पेरिविंकल स्कूल बावधनमध्ये आज‎ १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे‎ छत्रपती शिवाजी महाराज यांची‎ जंयती धुमधडाक्यात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी‎ करण्यात आली.‎जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपल्या सर्वांना बांधून ठेवणारं दैवत म्हणजे शिवराय!

 

याप्रसंगी सद्गगुरू वेदव्यास प्रतिष्ठान चे अध्यक्ष महाराष्टातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बाळासाहेब खरमाळे महाराज तसेच त्यांचे सुपुत्र गुरु अकादमीचे प्रेसिडेंट शशांक खरमाळे हे उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते‎ छत्रपती शिवाजी महाराजांच्या‎ प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण‎ करण्यात आला.

शिवजन्मोत्सवाची सुरुवात बाल शिवाजींच्या पाळण्याने करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान केलेल्या मुलांची सहवाद्ये मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात या यात्रेमुळे आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना उस्फूर्त करण्यासाठी शिवप्रेमींचा मोठा जनसागर लोटला होता. पेरिविंकल स्कूलच्या विध्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांच्या तालावर नृत्ये सादर करीत सर्वानाच मंत्रमुग्ध केले. महाराजांवरचे पोवाडे, कवनं अस्खलित पणे सादर केले. शिवव्याख्यानाने वातावरण शिवमय झाले. सगळ्या मराठी माणसांची नाळ जोडून ठेवणाऱ्या ढोल ताशा पथकाचे सादरीकरण हे विशेष आकर्षणाचा भाग ठरले. कार्यक्रमाची सांगता शिवछत्रपतींच्या आरतीने करण्यात आली.

यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक श्री राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व असेच कार्यक्रम नियमित होण्यासाठी आणि देशभावना जागृत ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.