सुस :
छत्रपती शिवाजी जयंती महाराष्ट्रासाठी अभिमान आणि उत्सवाचा दिवस” दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशालेत शिवजयंती अतिशय सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर मशाल हातात घेऊन शिवाजी महाराजांची पालखी अतिशय उत्साहाने मिरवणूक काढून आणली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आणि नेहा माळवदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवाजी महाराजांची आरती म्हणण्यात आली. त्यानंतर शिवगर्जना करण्यात आली. शिवगर्जना केल्यानंतर जणू काही शिवरायांच्या दरबारात असल्यासारखे जाणवत होते. सहभागी विद्यार्थी पारंपारिक वेशेमध्ये आले होते.
इयत्ता सहावी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी जय शिवाजी जय भवानी यावर नृत्य केले. तसेच शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावर नृत्य करण्यात आली. त्यामध्ये शिवाजी महाराजांवर आलेले संकट त्यांनी कसे नामोहरम केले हे दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषण विद्यार्थ्यांनी केले शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सांगता महाराज शिवरायांना मानवंदना देऊन करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल तसेच शिवानी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षक गण व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने व जयंती उत्सव संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णा अंभोरे सर यांनी केले संपूर्ण सजावट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा शिवराज कदम आणि ज्ञानेश्वर मोरे सरांनी केले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन