August 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल पिरंगुटच्या राजनील लहू नलावडे याची मुळशी तालुका मल्ल सम्राट कुस्ती 2025 मध्ये उत्कृष्ठ कामगिरी

म्हाळुंगे :

मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे 16 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथील राजनील लहू नलावडे याने उज्वल यश संपादन केले. 25 किलो वजन गटात त्याने तृतीय क्रमांक पटकावला आणि आपल्या कुस्ती कौशल्याचा प्रभावी ठसा उमटवला.पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात. राजनील सध्या इयत्ता चौथीत शिक्षण घेत असून एवढ्या लहान वयात त्याने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

 

यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि यश बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, शाळेतील पर्यवेक्षिका पूनम पांढरे आणि प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पल्लवी नारखेडे,इंदू पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे. भविष्यातही तो अशीच उत्तम कामगिरी करत राहो, हीच शुभेच्छा!

 

You may have missed