बाणेर :
अखिल बालेवाडी एक गाव एक शिवजयंती उत्सव २०२५ निमित्ताने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या सहकार्याने बाणेर तुकाई टेकडीवर हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाला राहुलदादा बालवडकर यांनी उपस्थित राहून स्वतः वृक्षारोपण केले आणि उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगत भविष्यात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात अनेक पर्यावरणप्रेमी, शिवभक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी वृक्षारोपण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*