May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल बावधनच्या विद्यार्थ्यांची तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी.

म्हाळुंगे :

16, 17 फेब्रुवारी रोजी बालेवाडी स्टेडियम म्हाळुंगे, येथे झालेल्या पाचवी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटामध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बावधन येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी वीर शिंदे ह्याने सुवर्णपदक पटकावले. तसेच इयत्ता नववीत शिकणाऱ्या आर्यन देसाई ह्याने रौप्यपदक पटकावले. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सरस्वती भंडारी व इयत्ता सातवीत शिकणाऱ्या स्वरण्या नायडू व दीप बडेकर ह्यांनी कांस्यपदक पटकावले.

 

विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात.

यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल व तडफदार संचालिका कु.शिवानी बांदल यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी तसेच क्रीडा शिक्षक श्री. सुरज साठे सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.