पिरंगुट :
बालेवाडी येथे दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी ५ व्या महाराष्ट्र स्टेट ओपन तायवोंडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंरगुट मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
सम्राट गराडे याने सुवर्ण पदक, प्रांजल मिश्रा हिने रौप्य पदक तर स्वराज रकमे ,वेदांत रणावरे, रोनित परमार, जय निकते, यथार्थ कुलकर्णी,आर्यन दुगाने , जमील शेख,आकाक्षा येवले यांनी कास्य पदक मिळवून या यशामध्ये भर टाकली.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शाळेसह संपूर्ण मुळशी तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि यश बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, शाळेतील पर्यवेक्षिका पूनम पांढरे आणि प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पल्लवी नारखेडे,इंदू पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पेरिविंकाल इंग्लिश मिडीयम स्कूल पिंरगुट येथील तायवोंडो प्रशिक्षक प्रवीण मोरे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
More Stories
सुस गावातील गणेशोत्सवात बाळासाहेब चांदेरे यांचा सहभाग; भाविकांना दिल्या शुभेच्छा…
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुटची अभिमानास्पद विजेती श्रावणी जाधव
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे आणि विधाते वस्ती परिसरात पूनम विधाते यांना आरतीचा मान, दिल्या गणेश भक्तांना शुभेच्छा..