बाणेर :
बाणेर वर्षा गार्डन परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपली असून,पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून या भागातील रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. त्यांच्याच शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर व पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली.
या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे स्थानिक रहिवाशांना सुरक्षित, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा मार्ग उपलब्ध होणार आहे. परिसरातील वाढती रहिवासी संख्या आणि वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यात अधिक सोयीसुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या प्रसंगी समीर चांदेरे, युवक अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सांगितले, “बाणेर-बालेवाडीच्या विकासासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना उत्तम सुविधा मिळवून देणे हेच आमचे प्राधान्य आहे.”





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*