सुस :
सुस येथील फ्रेशिआ सोसायटी समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ आज पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला गोपीतात्या चांदेरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण
फ्रेशिआ सोसायटीसमोरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. अपुऱ्या सुविधा, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली होती.
या रस्त्याच्या पुनर्बांधणीमुळे स्थानिक रहिवाशांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. तसेच नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ मिळेल. “आपल्या परिसरातील नागरी सुविधांकडे आमचे लक्ष असून चांगले रस्ते, स्वच्छ परिसर आणि विकासकामे करण्यावर आमचा भर राहील.”
~ समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद
या कामाच्या शुभारंभामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक रहिवाशांनी या रस्त्यामुळे खूप मोठी समस्या दूर होणार असल्याचे सांगितले. म्हणून उपस्थित नागरिकांनी चांदेरे परिवाराचे आभार मानले आणि पुढील काळातही अशाच प्रकारच्या सुविधा पुरवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे येत्या काही दिवसांत हे काम वेगाने पूर्ण होईल आणि परिसरातील वाहतुकीला नवा गतीमान आणि सुरक्षित मार्ग मिळेल, अशी अपेक्षा आहे.
More Stories
भोर, राजगड, मुळशीच्या विकासाला गती: आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नांना यश, नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रश्न मार्गी लावला
पेरिविंकलच्या बावधन शाखेत पूर्व प्राथमिक विभागाचा “न भूतो न भविष्यती” पदवीप्रदान समारंभ साजरा.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाणेर चे रहिवासी भरत गिते यांचा विशेष सत्कार