March 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने ‘वामा वुमन्स क्लबचा’ हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..

पुणे :

वामा वुमन्स क्लब तर्फे संक्रांतीनिमित्त आयोजित हळदीकुंकू समारंभ कुंदन मंगल कार्यालय, बाणेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

 

या समारंभात उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू साजरे केले आणि एकमेकींना आनंदाने शुभेच्छा दिल्या. वामा वुमन्स क्लब महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवत आहे. महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद हा अशा नव्या उपक्रमांना बळ देणारा ठरत आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, पुणे व अध्यक्ष, वामा वुमन्स क्लब) यांनी विशेष पुढाकार घेतला. महिलांनी आपल्या उपस्थितीने समारंभ अधिक मंगलमय केला.

महिलांसाठी असे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत राहावेत, अशी मागणी यावेळी उपस्थित महिलांनी केली. वामा वुमन्स क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. भविष्यातही स्त्री-सशक्तीकरण आणि एकोप्याचे उपक्रम राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.