पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “तरंग २०२५” मोठ्या उत्साहात ६ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा होता. या स्नेह संमेलनात पिरंगुट,पौड, माले, कोळवण येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलन व रंगमंच पूजन करून कण्यात आला . यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून मा. श्री. पुष्पाताई कनोजिया – माजी नगरसेविका, मा. श्री. बाळासाहेब चांदेरे – जिल्हा प्रमुख, पुणे, शिवसेना, मा.सौ सविताई दगडे (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद) गंगाराम मातेरे, सविता ताई गवारे (काँग्रेस च्या मुळशी तालुका अध्यक्षा ), राजाभाऊ गोरडे – नगरसेवक, युवा नेते सूर्यकांत भुंडे, मंदार घुले, पत्रकार संजय दुधाणे, पत्रकार विनोद मझिरे, सुहास दगडे, दीपक करांजवणे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, तरूण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल व यशराज बांदल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वप्राथमिक ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. गणेश वंदनेच्या माध्यमातून ९वीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिरसाची अनुभूती दिली. तसेच, नवरसांवर आधारित नृत्ये, दशावतारांवरील यू.व्ही. अॅक्ट, छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित गीत, पश्चिमी व पंजाबी गाणी, भयपट, महिला सशक्तीकरणावर विशेष सादरीकरण, दक्षिण भारतीय नृत्य, रेट्रो टू मेट्रो बालमजुरी, क्रीडाविश्व ,जय जवान जय किसान आणि तानाजी थीमवरील सादरीकरणांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना, गाण्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे बहाल करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, नारळ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. “तरंग” च्या लाटांवर स्वार होत हा कार्यक्रम एकजुटीचा, सृजनशीलतेचा आणि आनंदाचा उत्सव ठरला!
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल, शिवानी बांदल युवा संचालक श्री.यश बांदल सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन पेरिविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक इंदु पाटील, माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार आणि पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे, पौड च्या प्राजक्ता वाघवले, कोळवण येथील मयुरी दोशी व माले येथील रोहिणी शेंडे यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी यांच्या मदतीने अत्यंत शिसतबद्ध रीतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा भोसले, पल्लवी सकपाळ व विद्यार्थ्यांनी केले होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
More Stories
भोर, राजगड, मुळशीच्या विकासाला गती: आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नांना यश, नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रश्न मार्गी लावला
पेरिविंकलच्या बावधन शाखेत पूर्व प्राथमिक विभागाचा “न भूतो न भविष्यती” पदवीप्रदान समारंभ साजरा.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाणेर चे रहिवासी भरत गिते यांचा विशेष सत्कार