पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल च्या पौड शाखेच्या पहिल्याच वर्षी बसलेल्या इयत्ता दहावीच्या बॅचने शंभर टक्के निकालाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवत शाळेच्या गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत निदिप अनिल राऊत याने ७२.८० % गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उत्तम गुण मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे सांगितले.
शाळेच्या संचालिका आदरणीय रेखा बांदल मॅडम व शिवानी बांदल मॅडम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. तसेच शाळेच्या प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित, पौड शाखेच्या मुख्याध्यापिका वीणा कदम, समन्वयक प्राजक्ता वाघवले व नेत्रा काकडे यांच्या योग्य नियोजन, शैक्षणिक मार्गदर्शन व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा पेरीविंकल समूहाचा प्रयत्न यंदाही यशस्वी ठरला असून, पेरीविंकलच्या सर्व शाखांची शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखण्यात शाळेला यश आले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी