May 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंलकचे फूल पुन्हा उमलले!! एस्एस्‌सीचा १००% निकालाची परंपरा कायम!

बावधन :

पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या वर्षीच्या एसएससी बोर्डाच्या निकालात शाळेने सलग १००% निकालाची परंपरा कायम राखत आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. कुमारी शांती हजारे हिने ९५.८०% गुण प्राप्त करत बाजी मारली तर ज्ञानेश्वरी पाटील आणि मयूर सुपेकर या दोघांनीही ९५.४० % गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले तर तृतीय क्रमांकावर येऊन आर्या साठे हिने ९१.२० % मिळवले. तर ज्ञानेश्वरी पाटील हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. एकूण १०१ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण मिळाले तर २९ विद्यार्थ्यांना ८०% हून अधिक गुण मिळाले. एकुण १०१ विद्यार्थी एसएससी परीक्षेला बसलेले होते. ४९ विद्यार्थी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवत यशस्वी झाले आहेत. विज्ञान तसेच इतर विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शाळेची मान उंचावली आहे.

शाळेच्या या दैदिप्यमान यशामागे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल व युवा संचालिका शिवानी बांदल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडीत यांचे प्रभावी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरले आहे. पर्यवेक्षिका सायली गायकवाड व शिरीन क़ाझी यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून शाळेने त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दिली.

या यशाचे खरे शिल्पकार म्हणजे मेहनती शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देणारे पालक. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले आहे. शाळेच्या संपूर्ण टीमचे, शिक्षकांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे !

पेरीविंकल स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, दर्जेदार शिक्षण व एकत्रित प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र आहे.