September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकलचा ‘यशदीप’ पुन्हा तेजाने उजळला; SSC बोर्डात घवघवीत यशाची परंपरा कायम!

पिरंगुट :

पिरंगुट येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या SSC बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. या वर्षीच्या एसएससी बोर्डाच्या निकालात शाळेने सलग १००% निकालाची परंपरा कायम राखत आपल्या उत्कृष्टतेची उज्ज्वल परंपरा अधिक भक्कम केली आहे.

यावर्षीच्या निकालात *कु. कार्तिकी अल्हाट हिने ९२.२०%* गुण मिळवत *प्रथम* क्रमांक पटकावला. *कु. पियुषा अल्हाट हिने ९१.८०% गुणांसह द्वितीय क्रमांक* मिळविला, तर *कु. मानवी राठोड हिने ९१.६०%* गुण मिळवत *तृतीय* क्रमांक संपादन केला. तसेच *श्रीराज पांढरे याने ९०.२०% गुणांसह चौथा* क्रमांक मिळविला आणि *कु. हर्षदा बलकवडे हिने ८८.२०% गुणांसह पाचवा* क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व युवा संचालिका कु. शिवानी बांदल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. तसेच पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम वर्मा यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरणामुळे हे यश अधिक उजळून निघाले आहे.

प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार ,पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शिक्षक व पालकांचेही विशेष अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे पेरिविंकल स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक मार्गदर्शन यांच्यामुळेच यशाचे शिखर गाठता येते. शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

You may have missed