बाणेर :
मकरसंक्रांतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर आणि ज्योती राहुल बालवडकर यांच्या वतीने बालेवाडी, बाणेर, सुस आणि म्हाळुंगे येथील महिलांसाठी हळदी-कुंकू संगीत समारंभ व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात बालेवाडी भजनी मंडळाच्या भक्तिगीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. तसेच लेह लडाख येथे झालेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या पृथ्वीराज विनोदे याचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला बाणेर पोलीस चौकीचे पीआय नवनाथ जगताप, सौ. सरला (अक्का) बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला व युवती आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहभोजन, संगीत आणि भजनाच्या संगमाने हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. समारोपाच्या वेळी आयोजक आणि मान्यवरांनी उपस्थितांचे आभार मानून सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
More Stories
सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप..’व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान
बाणेर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान; अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते
बालेवाडीत पर्ल सोसायटी मागे अतिवृष्टीमुळे तुंबलेल्या ड्रेनेज लाईन राहुल दादा बालवडकर यांच्या प्रयत्नातून साफ!