May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे येथील श्री सूर्यमुखी गणेश तरुण मित्र मंडळाच्या श्री गणेश प्राणप्रतिष्ठा, नूतन मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.. सौ पूनम विधाते यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे येथील विविध गणेश मंदिरांना दिल्या भेटी..

म्हाळुंगे :

गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर म्हाळुंगे येथील श्री सूर्यमुखी गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित श्री गणेश प्राणप्रतिष्ठा, नूतन मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या वेळी आमदार शंकर भाऊ मांडेकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांची विशेष उपस्थिती होती.

 

अष्टधातूंच्या भव्य मूर्तीचे अनावरण

यावेळी मंदिरात तीन फूट उंचीची अष्टधातूची भव्य श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. या मूर्तीचे अप्रतिम रूप आणि त्याचे वैशिष्ट्य भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. श्रीगणेशाच्या नयनरम्य मूर्तीचे दर्शन घेताना भाविकांची भावनिक आणि आध्यात्मिक उंची अधिकच वाढताना दिसली.

सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पूजन संपन्न झाले. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पार पडलेल्या या भव्य सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

मा. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा सत्कार

याप्रसंगी मा. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा आमदारपदी निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

गणेश जयंती निमित्त सौ. पूनम विशाल विधाते यांची विविध गणेश मंदिरांना भेटी आणि जनसंवाद

गणेश जयंतीच्या पावन दिवशी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्यध्यक्षा पूनम विधाते यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे येथील विविध गणेश मंदिरांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी गणेश भक्तांशी संवाद साधत त्यांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी या निमित्ताने मिळाली. गणेश मंदिरांत धार्मिक विधी, पूजन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमय प्रसंगी भक्तगणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सर्व उपस्थित गणेश भक्तांना गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर)