बाणेर :
लेह-लडाख येथे नुकत्याच संपन्न झालेल्या खेळो इंडिया विंटर स्पर्धा २०२५ मध्ये बाणेर येथील यंगस्टर क्लबच्या खेळाडूंनी शॉर्ट ट्रॅक आइस स्केटिंग आणि लॉन्ग ट्रॅक आइस स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्र संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
शॉर्ट ट्रॅक आइस स्केटिंगमध्ये भरीव यश
• सुमित तापकीर – १ सुवर्णपदक, १ कास्यपदक
• अथर्व परदेशी – १ सुवर्णपदक
• अन्वयी देशपांडे – २ रौप्यपदके
• यशवी पाटील – १ कास्यपदक
• कुहू विद्वांस – १ कास्यपदक
लॉन्ग ट्रॅक आइस स्केटिंगमध्ये यशाची घोडदौड
• पृथ्वीराज विनोदी – १ कास्यपदक
• रिया गायकवाड – १ रौप्यपदक
या खेळाडूंच्या उल्लेखनीय योगदानामुळे महाराष्ट्राला खेलो इंडिया विंटर स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले. यंगस्टर क्लबच्या खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांमुळे महाराष्ट्र संघाच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले.
यंगस्टर क्लबचा उत्तम प्रशिक्षणामुळे यश
बाणेर येथील यंगस्टर क्लबचा संपूर्ण सराव आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंगपटू संजोग तापकीर, सुयोग तापकीर आणि सुमित तापकीर या तीन भावंडांच्या मार्गदर्शनाखाली होतो. विशेषतः सुयोग तापकीर हा आंतरराष्ट्रीय खेळाडू असून, तो यावर्षी एशियन विंटर गेम्ससाठी चीन येथे खेळण्यासाठी निवडला गेला आहे.
महाराष्ट्राच्या आइस स्केटिंगला नवा गौरव
आंतरराष्ट्रीय खेळाडू सुयोग तापकीर आणि सुमित तापकीर यांनी सलग तीन वर्षे खेळो इंडिया स्पर्धेत पदके जिंकून महाराष्ट्रासाठी आइस स्केटिंग क्रीडा प्रकारात नवे मोलाचे स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या योगदानामुळे हा खेळ महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे.


More Stories
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न!