पुणे :
बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील अर्धवट रस्त्यांच्या विकासासंदर्भात कोथरूड विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिसिंग लिंक रस्त्यांचा आढावा घेण्यात आला तसेच रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी गणेश कळमकर यांनी बाणेर-बालेवाडी भागातून पाहिले प्रयोरिटी ने कुठले रस्ते केले पाहिजेत याची माहिती बैठकीत दिली. तसेच जागा मालकांना मोबदला दिल्या शिवाय काही रस्ते ताब्यात येणार नाहीत तिथे शासनाने मोबदला द्यावा व अर्धवट रस्ते पूर्ण करावेत व काही पर्यायी रस्त्याना येणाऱ्या अंदाज पत्रकात बजेट उपलब्ध करून द्यावे हि मागणी केली.
या बैठकीत मा. कॅबिनेट मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रलंबित रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महत्त्वाचे रस्ते आणि विकासकामे
या बैठकीत बाणेर-बालेवाडी-पाषाण परिसरातील वाहतूक समस्येच्या सोडवणुकीसाठी विविध रस्त्यांवरील प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे –
• बालेवाडी एफ रेसिडेन्सी ते कस्पटे वस्ती-वाकड रस्ता
• बाणेर-पाषाण ३६ मीटर लिंक रोड
• अमर शेरीनिटी ते भेगडे नगर रस्ता, पाषाण
• ननावरे ब्रिज ते न्यू पॅनकार्ड क्लब जोडणारा रस्ता
• रघुनाना चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्याची योजना
• नवीन तीन अंडरपास उभारणी
• ज्युपिटर हॉस्पिटल ते लक्ष्मी माता मंदिर रस्ता
• बाणेर-बालेवाडी शिवेवरील प्रथमेश पार्क ते बालेवाडी मेन रोड
रस्त्यांचे काम पूर्ण करून वाहतूक कोंडी सोडवणार – चंद्रकांतदादा पाटील
बैठकीनंतर बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, “बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडूनही विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.”
बैठकीस प्रमुख मान्यवर उपस्थित :
या वेळी आमदार योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक जावेद पठाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, मालमत्ता विभागाचे महेश पाटील, दिलीप काळे, गिरीश दापकेकर, विजय नायकर, अविनाश संकपाळ, राऊत, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, दिलीप वेडे-पाटील, शिवरामपंत मेंगडे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन