पाषाण :
सचिन दळवी सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मंत्री चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मेगा फाइनल सामना कोकाटे क्रिकेट अकादमी मैदानावर उत्साहात पार पडला. या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास लोकनेते, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. विजयी संघांना त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या वेळी पंचक्रोशीतील माजी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कॅम्पिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. त्यांनी आयोजक सचिन दळवी यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या कार्याची दखल घेत चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून सचिन दळवी यांच्या हातात घालून त्यांच्या कार्याला गौरवले. सचिन दळवी यांनी विविध उपक्रमातून नेहमीच नागरिकांची सेवा केली आहे. या वेळी एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला हाफ पिच क्रिकेट स्पर्धा – विजेता संघ
महिला क्रिकेट गटामध्ये उत्कृष्ठ खेळाचा प्रत्यय देत परफेक्ट १० स्ट्रायकर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाने ३१,००० रुपये व ट्रॉफी जिंकली. यश्विन आनंद संघाने द्वितीय क्रमांक मिळवत २१,००० रुपये व ट्रॉफी जिंकली.
भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा (पुरुष गट) – विजेता संघ
पुरुषांच्या भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेत जे फाइव्ह इलेव्हन कोंढवा क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि १,११,१११ रुपये व भव्य ट्रॉफी जिंकली.
• द्वितीय क्रमांक : न्यू गोल्डन सीसी बावधान क्रिकेट संघ (७१,००० रुपये व ट्रॉफी)
• तृतीय क्रमांक : डीके पँंथर वाघोली क्रिकेट संघ (५१,००० रुपये व ट्रॉफी)
• चतुर्थ क्रमांक : सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब (३१,००० रुपये व ट्रॉफी)
या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटपटूंना संधी मिळाली असून, त्यांच्यातील गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली जाईल, तसेच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित राहुन स्पर्धेचे कौतुक करत स्वतःच्या हातातील घड्याळ माझ्या हाती घालत आशिर्वाद दिले हा क्षण माझ्या राजकीय आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे.
– सचिन दळवी (सरचिटणीस: भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल)
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक प्रमोद आण्णा निम्हण, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू आण्णा बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, अनिकेत चांदेरे, प्रमोद कांबळे, विवेक मेथा, सचिन सुतार, सुशील सरकटे, आनंद जराड, वंदना सिंह, सुरेखा वाबळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक, खेळाडू, प्रेक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व स्पॉन्सर्सचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेला परिसरातील क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले