May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथिल सौ. पूनम विशाल विधाते यांना संवाद व्यासपीठ आयोजित ‘कर्तुत्व गौरव पुरस्कार’ प्रदान…

थेरगाव :

संवाद व्यासपीठ आयोजित कर्तुत्व गौरव पुरस्कार २०२५ हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा आज पुण्यातील शिव कॉलनी सांस्कृतिक हॉल, थेरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. हा सोहळा म्हणजे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आणि प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देणारा क्षण ठरला.

 

सौ. पूनम विशाल विधाते यांचा विशेष सन्मान

या सोहळ्यात महिला जनजागृतीच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सौ. पूनम विशाल विधाते यांना कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महिलांचे सबलीकरण, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याने अनेक महिलांना नवी दिशा मिळाली आहे.

पुरस्कार स्वीकारताना सौ. पूनम विशाल विधाते यांनी सांगितले की, “या पुरस्कारामुळे माझ्या सामाजिक कार्याचा सन्मान झाला आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्या समाजात बदल घडवण्याचा निर्धार करत आहेत. पुढील काळातही महिलांच्या हक्कांसाठी मी माझे कार्य सुरूच ठेवेन.”

You may have missed