पिरंगुट :
दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी मुळशी तालुका कुस्ती गट तालिम संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पिरंगुट येथे कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी विघ्नेश वरुते याने बालगट ४८ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण २२० कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.
विघ्नेशच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शाळेसह संपूर्ण मुळशी तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि यश बांदल यांनी विघ्नचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, शाळेतील पर्यवेक्षिका इंदू पाटील माध्यमिक विभाग प्रमुख पूनम पांढरे आणि प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पल्लवी नारखेडे व क्रीडा शिक्षक हनुमंत मणेरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली.
More Stories
आयटी सोशल सर्कल बाणेर बालेवाडी आणि MSEB यांच्यात बाणेर-बालेवाडी येथे विद्युत सुरक्षा सुधारणांवर महत्त्वपूर्ण चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
बाणेरच्या ओरिअन रेजेन्सी सोसायटीसमोरील पदपथाचे काम पूर्ण; नागरिकांनी समीर चांदेरे यांचे मानले आभार