February 12, 2025

Samrajya Ladha

बालेवाडी-बाणेर व्यापारी असोसिएशनची बैठक बाणेर येथे संपन्न, संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार…

बाणेर :

बालेवाडी-बाणेर व्यापारी असोसिएशन ची विशेष बैठक हॉटेल सदानंद येथे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ निवंगुने यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या सहकार्याने संपन्न झाली.

 

बालेवाडी-बाणेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटना अधिक मजबूत होत असून राजेश विधाते आणि वसंत ताजणे यांचा व्यापारी वर्गाशी असलेला संवाद संघटनात्मक बांधणी करण्यासाठी महत्वाचा ठरत आहे.

बालेवाडी बाणेर भागात खूप मोठा व्यापारी वर्ग असून या परिसरातील नागरीकांच्या महत्वपूर्ण घरचा भाग होण्याचे काम व्यापारी बांधव करत आहे. आपला व्यवसाय करत असताना ग्राहकाच्या मागणीनुसार सेवा पुरविण्यावर भर दिला पाहिजे. व्यापारी बांधवांना विविध अडचणी येत असतात त्या बालेवाडी बाणेर व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून निश्चित सुटल्या जातील. संघटनेला जेव्हा गरज लागेल तेव्हा सहकार्य करण्याच्या भूमिकेत मी नेहमी असेल.
राहुलदादा बालवडकर(उपाध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

व्यापाऱ्यांनी संघटनात्मक एकत्र येवून आपली दिशा ठरवत हितसंबंध कसे जोपासले पाहिजे याचे मौल्यवान मार्गदर्शन मार्गदर्शन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ निवंगुने यांनी केले.

रामलालजी काग यांनी देखिल आपले अनुभव सांगून व्यापारी सदस्यांना प्रोत्साहित केले. यावेळी परिसरातील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. तसेच नवीन व्यापाऱ्यांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले.

You may have missed