February 12, 2025

Samrajya Ladha

बाणेर बालेवाडी येथील जुपिटर हॉस्पिटल शेजारी डीएसके गंधकोश सोसायटी समोर मनसे नेते अनिकेत मुरकुटे यांच्या वतीने शेतकरी आठवडे बाजार सुरू..

बाणेर :

मकर संक्रांतीचे निमित्त सादर बाणेर बालेवाडी येथील जुपिटर हॉस्पिटल शेजारी डीएसके गंधकोश सोसायटी समोर मनसे नेते अनिकेत भाऊ मुरकुटे यांच्या वतीने शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला. हा आठवडे बाजार दर मंगळवारी सुरू राहणार असुन याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

दैनंदिन जीवनामध्ये अत्यावश्यक असणारा भाजीपाला नागरिकांना उत्तम प्रतीचा उपलब्ध करून देता यावा म्हणून आठवडे बाजार सुरू केला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. येणाऱ्या पुढील काळात देखील नागरिकांना उपयोगी पडेल अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवित राहणार आहे.
अनिकेत मुरकुटे (मनसे बाणेर बालेवाडी)

यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जवळ सुविधा उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला.

You may have missed