May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर – बालेवाडी मधील नागरिकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या चुकीच्या कृत्यामुळे होणारा त्रास सहन करणार नाही : ज्योती गणेश कळमकर

बाणेर :

बाणेर – बालेवाडी मधून जाणाऱ्या मुळा नदी पात्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने विशाल नगर बाजूने राडारोडा, मातीचे भराव टाकून नदीचे पात्र कमी करत अतिक्रमण करून सुरक्षा भिंत बांधली जाणार असल्याने बालेवाडी येथील भीम नगर आणि बाणेर मधील प्रथमेश पार्क, डी एस के गंधकोश सोसायटी,साई दत्त सोसायटी, कपिल मल्हार सोसायटी मध्ये पावसाळ्यात धोकादायक परिस्तिथी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत माजी नगरसेविका ज्योती कळमकर, आणि भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी निषेध नोंदवत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला जनआंदोलन उभारण्याचा इशारा देणारे निवेदन दिले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या कृतिमुळे नदीचे पात्र लहान होणार आहे व विशाल नगर, पिंपळे निलिख भागातून उंच मातीचा भरावं टाकल्याने पावसाळ्यात बालेवाडी मधील भीमनगर व बाणेर मधील प्रथमेश पार्क, डी एस के गंधकोश सोसायटी,साई दत्त सोसायटी, कपिल मल्हार सोसायटी मध्ये पाण्याचा शिरकावं होणार आहे,नागरिकांच्या घरा मध्ये व पार्किंग मध्ये पाणी साचते यामुळे येथील रहिवासी यांचे जीवनमान विस्कळीत होते व त्यांना आर्थिक फटका बसतो. तरी पालिकेने त्वरित सुरक्षा भिंतीचे काम थांबवावे व येथील भराव काढून घ्यावा अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल.
ज्योती गणेश कळमकर
माजी नगरसेविका पुणे मनपा