पिरंगुट :
पिरंगुट (ता. मुळशी) येथील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या जयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि जिजामाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.
कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थिनी हर्षदा बलकवडे हिने स्वामी विवेकानंद आणि पियुषा आल्हाट हिने जिजामाता यांच्या कार्यावर आधारित प्रभावी भाषण सादर केले. या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. प्राथमिक विभागातील दुसरीचा विद्यार्थी पृथ्वीराज शिरसाट याने स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेतून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजामाता यांच्या काळातील ऐतिहासिक घडामोडी सादर करताना त्यांच्या विचारधारेचे महत्त्व पटवून दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली सुपरवायझर इंदू पाटील, माध्यमिक विभाग प्रमुख पूनम पांढरे आणि प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पल्लवी नारखेडे यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षकांच्या मदतीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थित अत्यंत शिस्तबद्ध0 पद्धतीने संपन्न झाला.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल आणि शिवानी बांदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सीमा कांबळे यांनी केले.
More Stories
सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व अध्यक्ष, वामा वुमेन्स क्लब) यांच्या वतीने ‘सावतामाळी महिला भजनी मंडळ, बाणेर’ यांचा सत्कार
बाणेर येथे महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘सेल्फ ग्रुमिंग व सेल्फ मेकअप वर्कशॉप’चे ज्योती राहुल बालवडकर यांचे आयोजन
बाणेर येथे पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम