सुस :
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सूस आणि म्हाळुंगे भागातील सोसायट्यांसाठी ३ कोटी रुपयांच्या निधीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेचा दोन दिवसांपूर्वी शुभारंभ सूस येथील तीर्थ अविला सोसायटी मध्ये करण्यात आला. यावेळी नागरिकांशी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी संवाद साधला असता सोसायटीला जाणवणारी रस्त्याची समस्या समजताच लगेच त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले.
स्थानिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांदेरे साहेबांचे मार्गदर्शन हीच आमची प्रेरणा आहे.
–समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
पाण्याच्या समस्या सोडवत असतानाच चांदेरे परीवारामुळे नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने सोसायटी मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या समस्या सोडविल्याने नागरिकांनी चांदेरे यांचे आभार मानले.



More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा