May 11, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस येथील तीर्थ आरोही सोसायटीमध्ये प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा…

सुस :

सुस येथील तीर्थ आरोही सोसायटीमध्ये आयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा वर्षपूर्ती सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी झालेल्या प्रतिष्ठापनेच्या स्मरणार्थ आयोजित या सोहळ्याची सुरुवात मुळशीचे आमदार मा. शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर महिला कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते यांच्या उपस्थितीत श्रीराम प्रभूंची पूजा करून करण्यात आली.

 

या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. नागरिकांसोबतच्या संवादातून जनसंवादाला वाव मिळाला, तसेच भक्तीभावाने ओथंबलेल्या या वातावरणाने प्रत्येकाला नवीन ऊर्जा दिली. हा पवित्र सोहळा सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.
सौ.पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक 9 चे अध्यक्ष विशाल बाबुराव विधाते सामाजिक कार्यकर्ते शेखर रानवडे हेही उपस्थित होते.