बालेवाडी :
बालेवाडी येथील प्रभा पार्क, ब्लिस्स अपार्टमेंट, पारडिंगम ओपल, ओजस बंगला आणि मेट्रोपोलीस ऑफिस या लेन मधील ८ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याला डांबरीकरण करण्याचे काम माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने करून घेत या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली.
बालेवाडी परिसरात असणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी राहुलदादा बालवडकर पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यांनी रस्त्याचे डांबरीकरण करून घेताना रस्त्यालगत अनेक ठिकाणी झाडाच्या धोकादायक वाढलेल्या फांद्या कट करून घेतल्या व रस्त्या लगतचे बंद असलेले पथ दिवे चालू करून घेतले. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बालेवाडी गावात मोठ्या प्रमाणात सोसायटी वर्ग राहत असून ग्रामस्थांबरोबर सोसायटीधारक नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी मी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– राहुल बालवडकर (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)





More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!