सुस :
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि पुणे मनपा हद्दीत समाविष्ट गावांच्या विकासासाठी राज्य शासनाने नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य, पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून सुस आणि म्हाळुंगे भागातील सोसायट्यांसाठी ३ कोटी रुपये निधीच्या टँकरने पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेब यांच्या अथक प्रयत्नांमुळे सूस भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. ३ कोटी रुपये निधीतून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आज सुखवाणी हायलँड आणि सुखवाणी ग्रेसिया येथे या पाणीपुरवठा वाटप योजनेचा शुभारंभ मा.चांदेरे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला.
महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याच्या टँकरमुळे सोसायट्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भार देखील कमी होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेला आनंद आणि समाधान हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
या प्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री बाबूराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे अध्यक्ष श्री समीरभाऊ चांदेरे सोसायटमधील सदस्य व नागरिक उपस्थित होते.




More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले