November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे शिवसैनिक डॉक्टर दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने ओम शिवाजी बांगर यांचा वाढदिवस साजरा..

बाणेर :

बाणेर येथे शिवसैनिक डॉक्टर दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने माजी नगरसेवक कै. शिवाजी बांगर यांचे चिरंजीव युवा नेते ओम शिवाजी बांगर यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त पगडी, शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कै. शिवाजी बांगर हे आमचे मित्र असून आम्ही बरोबरीने समाज कार्यात अग्रेसर होतो. त्यांनी केलेल्या कार्यामुळे नागरिकांनी त्यांना नगरसेवक केले. त्यांच्या पाश्चात्य त्यांचे चिरंजीव ओम बांगर याने वडिलांचा आदर्श घेत समाजकार्य सुरू ठेवावे त्यासाठी आम्ही नेहमीच त्याला मार्गदर्शन करू. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी माझ्या सदिच्छा! डॉ. दिलीप मुरकुटे पाटील ( शिवसैनिक/संस्थापक अध्यक्ष माननीय नागरी पतसंस्था)

यावेळी ॲड. विशाल पवार, वसंत चांदेरे, रखमाजी पाडाळे, हिरामण तापकीर, कृष्णा चांदेरे, गणेश पाडाळे, संतोष चव्हाण, किरण मुरकुटे, संतोष भोसले, पत्रकार आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसहकारसेना संपर्क प्रमुख पुणे जिल्हा/ माजी शासकीय सदस्य बाळासाहेब भांडे यांनी केले.