पाषाण :
पाषाण सुस रोड येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री आणि कोथरूड विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने भाजपा युवा मोर्चा कोथरूड विधानसभा अध्यक्ष रोहन कोकाटे आयोजित दि. ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद लाभला.
तज्ञ डॉक्टरांनी दिलेले मार्गदर्शन, वैद्यकीय सल्ले आणि आरोग्य तपासण्या करून घेण्यासाठी नागरिकांनी दीर्घ रांगा लावल्या होत्या. अनेक नागरिकांनी शिबिराची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले.आजच्या या उपक्रमाच्या समारोपानंतर, नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जाणीव हि अधिक दृढ झाल्याची बाब प्रकर्षाने जाणवली.
हे शिबिर केवळ तपासणी पुरते मर्यादित नव्हते, तर नागरिकांना आरोग्याच्या सर्व पैलूंवर सल्ला देणारे एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म होते.
आजच्या शिबिराच्या समारोपानंतर नागरिकांनी तंत्रज्ञान, नाविन्य आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व यांचा आदर्श म्हणून या शिबिराचा गौरव यावेळी केला आणि हे शिबिर भविष्यात देखील सुरू ठेवण्याच्या अभिप्राय या वेळी नोंदवला.
शिबिराच्या यशस्वितेबद्दल सर्व सहभागींनी समाधान व्यक्त केलं. आरोग्यविषयक ज्ञान आणि तपासणी मिळवण्यासाठी नागरिकांचा उत्साह आणि त्यांचा भरभरून प्रतिसाद खूपच प्रेरणादायक होता. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सर्व सहभागी डॉक्टर, स्वच्छता पथक आणि स्वयंसेवक आणि कार्यकत्यांचे आभार.
– रोहन कोकाटे (अध्यक्ष : भाजपा युवा मोर्चा कोथरूड विधानसभा)


More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा