थेट शेतकरी To ग्राहक ताजा भाजीपाला उपलब्ध होणार- शिवम बालवडकर
बालेवाडी :
जगाचा पोशिंदा अन्नदाता, कष्टकरी शेतकरी बांधवांची आणि ग्राहकांची गरज ओळखून रामकृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पुणे व शिवम बालवडकर उपाध्यक्ष युवा मोर्चा पुणे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांना योग्य बाजार भाव मिळावा म्हणून शेतकरी आठवडी बाजाराचा शुभारंभ जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
परिसरातील सर्व शेतकरी बांधवानसाठी आता आठवडी बाजारासाठी आपला माल घेऊन लांब जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जागेवरच योग्य दर मिळून, थेट शेतकरी To ग्राहक भाजीपाला ताजा उपलब्ध झाला आहे. माता, भगिनी, ग्राहक यांना हिरव्यागार ताज्या पालेभाज्या मिळणार आहेत. परिसरातील गरज ओळखून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. तर जेष्ठ नागरिक व महिला भगिणीच्या वतीने कौतुकाचा वर्षाव शिवम बालवडकर यांच्यावर होत आहे. या आधी आठवडी बाजारासाठी शहरात जाऊ शेतकऱ्यांना जावं लागतं होतं, त्यासाठी मोठा त्रास देखील सहन करावा लागत होता. दर शनिवारी हा आठवडी बाजार शिवम बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात भरणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिनभाऊ पाषाणकर, प्रभाग अध्यक्ष सुभाषजी भोळ, महिला मोर्चा उपाध्यक्ष कल्याणीताई टोकेकर व
प्रमोद खाडेकर, तुकाराम मोरे, अशोक शिंदे, रमेश मोहकर, दिलीप भट, शेखर सावरकर, हरिश्चंद्र दिवेकर, सुधीर जोशी, शशिकांत गवळी, अनिल रुखमागद, किसनतात्या बालवडकर, प्रकाश बालवडकर, विकी बालवडकर, बाळा नेटके, बालाजी मुळे, आणि बाळासाहेब पानसे उपस्थित होते.



More Stories
बालेवाडीतील 1 कोटी रुपये खर्चून बांधलेली भाजी मांडई बंद का? — नागरिकांकडून उत्तरदायित्वाची मागणी, जयेश मुरकुटे यांचा जनआंदोलनाचा निर्धार
बाणेर मुळा नदी घाटावर छठ महापर्व उत्साहात साजरा — डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात शेकडो उत्तर भारतीय बांधवांची उपस्थिती
बालेवाडीतील छठ पूजेत श्रद्धा, आस्था आणि उत्साहाचा संगम.. अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी व अरविंदकुमार सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन