औंध :
सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पेशवेकालीन शिंदेशाही रयत शिक्षण संस्थेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर औंधगांव येथे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या आशीर्वादाने व ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14 वे बुधवार दि. 01 जाने.25 ते मंगळवार दि. 07 जाने.25 रोजी पहाटे 4:30 ते 6:30 काकड आरती, सकाळी 08 ते 11 वा.ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 01.30 ते 05.30 वा. महिला भजन, सायं. 05 ते 06 वा. हरिपाठ, सायं. 07 ते 09 वा. हरिकीर्तन व रात्री 09 वा. नंतर महाप्रसाद तसेच बुधवार दि. 08 जाने. 25 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वा. काल्याचे कीर्तन तदनंतर महाप्रसाद व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अशा सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी ह.भ.प श्री. योगीराज महाराज पैठणकर, श्री. गुरु पुंडलिक महाराज देहूकर, श्री. सतीश महाराज काळजे, श्री. शंकर महाराज बढे, श्री. श्रीकांत महाराज पातकर, श्री. चंद्रकांत महाराज वांजळे, श्री. धर्मराज महाराज हांडे, श्री. दशरथ महाराज मानकर अशा नामांकित कीर्तनकारांची कीर्तने झाली.
ज्ञानेश्वरी पारायणासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा, कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या सर्व सोहळ्याचे आयोजन रयत शिक्षण संस्था, जय भवानी मित्र मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान, औंधगाव भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, औंधगाव विश्वस्त मंडळ व समस्त औंधगाव ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी केले होते.
More Stories
“पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे शिवजयंती निमित्त संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा भव्य उत्सव!”
लिटिल मिलेनियम प्री-स्कूल, पिंपळे सौदागर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा..
बालेवाडी येथील लिटिल मिलेनियम स्कूल, येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा..