बाणेर :
बाणेर परिसरातील सर्व्हे न. ३१ येथील नागरिकांची भेट घेत भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी संवाद साधत तेथे उद्भवणाऱ्या नागरी समस्या जाणून घेतल्या. पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन बालवडकर यांनी दिले.
नागरिकांनी यावेळी पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना नागरी समस्या सोडविण्यासाठी निवेदन शिवम बालवडकर यांच्या कडे दिले.
बाणेर परिसरातील सर्व्हे न. ३१ येथील नागरिकांशी संवाद साधला असता येथे नागरिकांना रोड, ड्रेनेज आणि स्ट्रीट लाइटच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समजले. नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागतो, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील.
– शिवम बालवडकर (उपाध्यक्ष : भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!