बाणेर :
बाणेर परिसरातील मेडीपॉईंट हॉस्पिटल, विधाते वस्ती, कुंदन परिसर, आंबेडकर नगर आणि पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिकांसाठी २४x७ पाणीपुरवठा योजने अंतर्गत कलमाडी बंगला, बाणेर येथील नव्याने बांधलेल्या ३० लाख लिटर पाण्याच्या टाकीमधून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी साठे साहेब, सौरभ सकटे ,प्रदिप रंगदाळे,अश्विनी घोगरे, पाटील सर, सचिन नाईक यांच्यासह किरण बाबुराव चांदेरे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
याची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सांगितले की, हजारो कुटुंबांना लाभ होणाऱ्या या योजनेमुळे अनेक वर्षांपासून या भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधाते वस्तीतील नागरिकांना आतापर्यंत केवळ रात्रीच्या वेळेस पाणी मिळत असे. यामुळे अनेक माय-माऊलींना कामाच्या वेळा सांभाळून रात्री पाण्यासाठी कसरत करावी लागायची. परंतु आजपासून या भागातील नागरिकांना दिवसा पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील हा मोठा बदल पाहून मला खरंच खूप आनंद होतोय.
हा प्रकल्प केवळ टाकी बांधून पूर्ण झाला नाही; यासाठी अनेक अडथळे पार करत प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी सातत्याने प्रयत्न केले. प्रभागातील माता-भगिनींच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढून त्यांचं आयुष्य थोडं अधिक सोपं करणं, हे चांदेरे परिवाराचे प्रामाणिक कर्तव्य होतं आणि आज ते पूर्ण करताना आम्हाला समाधान वाटत आहे.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
बाणेर-बालेवाडी, सुस, आणि म्हाळुंगे या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य हेच माझ्या प्रत्येक कृतीचं बळ आहे. आपल्याला स्वच्छ, सुजल, आणि प्रगत प्रभाग उभारायचा आहे, आणि त्यासाठी तुमचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.आपल्या साथीनं असाच विकासाचा प्रवास चालू राहील.
– बाबुराव चांदेरे (मा. अध्यक्ष स्थायी समिती पुणे मनपा)
More Stories
“मिशन निर्मल” अभियानाचा बाणेर-बालेवाडी मधील १७ वा व १८ वा दिवस — स्वच्छतेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! अमोल बालवडकर यांचा उपक्रम…
पाषाण परिसरातील नागरिकांना दिलासा प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ..
सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रम