February 19, 2025

Samrajya Ladha

सुस मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना राबविणार : समीर चांदेरे

सुस :

सुस येथील स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांची बाणेर येथील निवासस्थानी भेट घेऊन सुस भागातील नागरी समस्या मांडल्या. त्यावेळी यांच्या अडचणी समजून घेत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास समीर चांदेरे यांनी उपस्थित नागरीकांना दिला.

 

जनतेचा विश्वास, संवाद, आणि सहकार्यावरच प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास साधता येतो. आपल्या प्रत्येक समस्येवर ठोस उपाय आणण्यासाठी कटिबद्ध असून, सुस आणि परिसराचा विकास हा आपल्या सर्वांचे समान ध्येय आहे.
समीर चांदेरे (युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

समीर चांदेरे सुस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परीसरात नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरीक मोठया प्रमाणावर चांदेरे परिवाराशी संपर्क साधत आपल्या समस्या मांडत आहेत.