February 19, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथे मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या वतीने भाजपा प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बाणेर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ५) राज्यभरात भाजपा प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा सरचिटणीस गणेश कळमकर यांच्या वतीने गणराज चौक, बाणेर येथे जनसंपर्क कार्यालय, ABZ बिल्डिंग वीरभद्र नगर आणि कै बाबुराव सायकर (गणराज चौक) अशा तिन्ही ठिकाणी कॅम्प लावून भाजपा सदस्यता नोंदणी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. आज हजारो नागरिकांनी भाजपा सदस्य फॉर्म भरून सदस्य झाले.

 

भाजप सदस्यता नोंदणी अभियानास आज पासून प्रारंभ झाला. विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नागरीक मोठया उत्साहात या अभियानात सहभागी होत असून आपल्या परिसरातून जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा आमचा मानस आहे.
गणेश कळमकर (सरचिटणीस, भाजपा पुणे शहर)

यावेळी यावेळी सोबत निकिता माताडे, वैशाली कमाजदार, महेंद्र सायकर, संदीप कळमकर, प्रशांत म्हेत्रे उपस्थित होते.